मुंबई,दि.19: NCP Crisis: अजित पवार गटातील बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटानेही राष्ट्रवादीत फूट नसल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा वाद कोर्टात पोहचला आहे. असं असताना शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील फूट ही एक मोठ रहस्य बनत चालली आहे. शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटानंही राष्ट्रवादीत फूट नसल्याचा दावा केला आहे. अजित पवार गटातील बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोटमुळे संभ्रम आणखी वाढला आहे.
अजित पवार गटातील बड्या नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट | NCP Crisis
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचा दावा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. केवळ अध्यक्ष, पदाधिकारी बदलले आहेत. तसं निवडणूक आयोगालाही कळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या फुटीबाबतच्या संभ्रमात आणखीन भर पडलीय.
राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नव्या संसदेतला एक फोटो ट्विट केला आहे. प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांबरोबरचा हा फोटो सोशल मिडियावर शेअर केल्याने चर्चेला उधाण आले आहे. नव्या संसदेतलं राज्यसभेचं सभागृह सुंदर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबरचा हा क्षण स्पेशल आहे, असं पटेलांनी ट्विटमध्ये म्हटल आहे.