मुंबई,दि.10: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2029 ला कोण होणार पंतप्रधान हे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस बीकेसीमधील इंडिया ग्लोबल फोरम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले. भारतीय जनता पार्टीत ज्यांचे वय 75 होते ते नेते सक्रिय राजकारणातून निवृत्त होतात असा अलिखित नियम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सध्या 74 वय आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी सक्रिय राजकारणातून निवृत्त होतील अशी चर्चा सुरू आहे. तसेच मोदी निवृत्त झाल्यानंतर त्यांचा राजकीय वारस कोण असेल? याचीही चर्चा सुरू असते. 2029 ला पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या दिग्गजांच्या प्रयत्नांमुळेच भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष होऊ शकला. 2029 मध्ये मोदी पंतप्रधान होणार असल्यानं, पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल विचार करण्याची ही योग्य वेळ नाही.”