मुंबई,दि.25: Aeroplane Crash: कझाकिस्तानमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. अझरबैजान एअरलाइन्सचे प्रवासी विमान लँडिंगदरम्यान कोसळले. विमानात चालक दलातील पाच सदस्यांसह 67 लोक होते.
हे विमान अझरबैजानमधील बाकू येथून रशियातील चेचन्याला जात होते. अझरबैजान विमान अपघातात ४२ जणांचा मृत्यू झाल्याचं कझाकस्तान सरकारनं म्हटलं आहे. या घटनेत 25 जणांना बचावण्यात यशस्वी झाले. कझाकस्तानच्या आपत्कालीन सेवांचे म्हणणे आहे की विमान अपघातातील आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.
या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लँडिंगच्या वेळी विमानाला मोठी आग लागल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर संपूर्ण विमान आग लागते. विमान अपघाताची अनेक कारणे समोर येत आहेत.