सोलापुरात कोरोनाचा पहिला बळी, प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

0

सोलापूर,दि.३: सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या निरंक झाली होती. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा सोलापूर शहरात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली असून अश्विनी रुग्णालयात एका ७२ वर्षाच्या व्यक्तीचा या आजाराने बळी घेतला आहे. २२ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाली तेव्हा ती अत्यवस्थ होती. ३१ डिसेंबर रोजी त्या व्यक्तीचा मृत्यु झाला.

हा रुग्ण कोमोरबिड होता. त्याची कोविड चाचणी पॅाझीटीव्ह आली होती अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली. जे.एन.१ या नव्या व्हेरीएन्टचा हा रुग्ण होता का हे अद्याप समजले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा बायकोने नवऱ्यावर दाखल केला ॲट्रॅासिटीचा गुन्हा

सोलापूर शहरात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. शहरात एकुण १४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकाचा मृत्यु झाला आहे.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने खबरदारी घेतली आहे. महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रात कोरोनाची चाचणी मोफत करण्यात येत आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असलेल्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, कोरोनाची चाचणी करुन घ्यावी आणि स्वताला घरी विलगीकरण करुन घ्यावे असे आवाहन डॉ. कुलकर्णी यांनी केले आहे.

सध्या देशभरात जे.एन.१ या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचे परिणाम सौम्य आहेत. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. सोलापूरात कोरोना झालेल्या रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवले आहेत. त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही असेही डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here