Odisha Accident: बसच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

0

भुवनेश्वर,दि.२६: Odisha Accident: बसच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ओडिशामधील गंजाम जिल्ह्यातील दिगपहांडी पोलीस हद्दीतील खेमुंडी महाविद्यालयाजवळ रात्री उशिरा बसचा भीषण अपघात झाला. दोन बस समोरासमोर धडकल्यामुळे जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडणाऱ्या हॉलिवूड गायिकेची पोस्ट चर्चेत

Odisha Accident: बसच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वऱ्हाडींना रायगडाहून भुवनेश्वरला घेऊन जाणाऱ्या बसने दिगपहांडी येथील खेमुंडी महाविद्यालयाजवळ एका सरकारी बसला धडक दिली. या अपघातात जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अपघातातील जखमींना उपचारासाठी बेरहामपूर एमकेसीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, घटनेनंतर ओडिशा सरकारने प्रत्येक जखमीच्या उपचारासाठी 30 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here