सोलापूर,दि.२५: विठ्ठल दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकर्यांना सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी पेठ, घोंगडे वस्ती येथील सिध्दारुढ मित्र मंडळ आणि माऊली भक्त मंडळाच्या वतीने अस्सल सोलापुरी भोजन देण्यात आले.
वारकर्यांसाठी अस्सल सोलापुरी भोजनची व्यवस्था
माळशिरस येथे भोजनाचे नियोजन करण्यात आले होते.अनेक वर्षाांपासून माळशिरस येथे हा उपक्रम राबविण्यात येत असून, यंदाही भोजनाचे नियोजन करण्यात आले. यात पिठलं, ज्वारीची कडक भाकरी, दही, शेंगा चटणी, भजी, सोनपापडी, भात असा अस्सल सोलापुरी मेन्यू होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील 60 हजारांहून अधिक वारकर्यांनी याचा लाभ घेतला.
तब्येत खराब असतानाही वैष्णवांची सेवा करण्यासाठी स्वत: सुरेश पाटील, नरसप्पा मंदकल, विश्वनाथ मंदकल, सायबण्णा मुडल, बसवराज जाटगल, गंगाराम डोळ्ळे,अप्पू उळागंडे, व्यंकटेश जाटगल,मुदका करली, श्रीशैल माकणे, शिवपुत्र मंदकल,जाटगल परिवार, गंजेळ्ळी परिवार, डोळ्ळे परिवार, दाळगे परिवार, पाटील परिवार, तगारे परिवार, कोळी परिवार, डबरे, मेटी, पुजारी, स्वामी, मलूरे, तेगेळ्ळी ,मुडल, परिवारासह सिध्द गणेश भक्त मंडळी जातीने हजर होते.
या सोहळ्यामधून प्रेरणा मिळते आणि महाराष्ट्राची संस्कृतीचे दर्शन यातून होते. शिवाय राज्याच्या कानाकोपर्यात येणार्या वारकर्यांचा सहवास लाभतो. यामुळे उत्साह वाढतो, अशा भावना सुरेश पाटील यांनी व्यक्त केल्या. दरम्यान जगद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी माळशिरस येथे दाखल होताच वरूण राजाने जोरदार हजेरी लावली. भर पावसामध्ये वारकरी मंडळींना अस्सल सोलापुरी भोजनाचा आस्वाद घेता आला. गेल्या अनेक वर्षापासूनची ही प्रसाद सेवा परंपरा आजतागायत अविरत सुरू आहे यासाठी भवानी पेठ परिसरातील श्री सिद्धारुढ मित्र मंडळ, माऊली भक्त मंडळ आणि सिद्ध गणेश भक्त मंडळाच्या पदाधिकारी सेवा बजावून परिश्रम घेत आहेत.