सोलापूर,दि.18: येथील सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र महादेव गंभिरे व उपाध्यक्षपदी सुचेता मिलिंद थोवडे यांची एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यु. यु.पवार यांनी जाहीर केले.
सिध्देश्वर बँकेच्या अध्यक्षपदासाठी नरेंद्र महादेव गंभिरे यांचे नांव प्रकाश वाले यांनी सुचविले तर पशुपतीनाथ माशाळ यांनी अनुमोदन दिले. उपाध्यपदासाठी सुचेता मिलिंद थोबडे यांचे नांव तुकाराम काळे यांनी सुचविले तर बाळासाहेव आडके यांनी अनुमोदन दिले. या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आल्याने ही निवड अविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषीत केले.

निवडणूक अधिकारी यु. यु. पवार यांनी अध्यक्ष नरेंद्र महादेव गंभिरे व उपाध्यक्ष सुचेता मिलिंद थोबडे यांचे अभिनंदन केले यु. यु. पवार यांनी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच बँकेचे तज्ञसंचालक अॅड. डी. जी. चिवरी, C.A. श्रीधर रिसवुड, संचालक पशुपातीनाथ माशाळ, भिमाशंकर म्हेत्रे, बाळासाहेब आडके, अशोक लांबतुरे, प्रकाश हत्ती, कार्यलक्षी संचालक संजय घाळे आणि सरव्यवस्थापक राम शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करून नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांना त्यांची कारकीर्द यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नूतन चेअरमन नरेंद्र गंभिरे आणि व्हा. चेअरमन सुचेता थोबडे यांनी त्यांच्या निवडीबद्दल बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे आणि सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले. तसेच यंदा बँकेचे सूवर्ण महोत्सवी वर्ष सुरू आहे. या वर्षात सर्व सामान्य जनतेपासून मोठ्या उदयोगापर्यत सिध्देश्वर बँक पोचविण्याचा मानस व्यक्त केला.
या सभेस संचालक शिवानंद कोनापूरे, इरप्पा सालक्की, महेश सिंदगी, सिध्देश्वर मुनाळे, कार्यलक्षी संचालक राजेश कलशेट्टी, हे उपस्थित होते. सभेच्या शेवटी सहा. सरव्यवस्थापक संजय घाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.








