नंदुरबार,दि.10: नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंनी 5 वी राष्ट्रीय सब ज्युनिअर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत यश मिळवित राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व मिळविले आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या विद्यमाने नाशिक येथील म्हसरुळ क्रिकेट मैदानात पाचवी राष्ट्रीय सब ज्युनिअर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू लोकेश मराठे, उत्कर्ष परदेशी, ध्रुव पटेल, पुष माहेश्वरी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यात खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी केल्याने महाराष्ट्राच्या संघाला उपविजेता ठरला. तर नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू लोकेश मराठे हा मालिकावीर हा ठरलाा असून त्यास पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेल्या यशातून लोकेश मराठे यांनी नंदुरबार जिल्ह्याचे नाव व नंदुरबार जिल्ह्याचे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे नाव महाराष्ट्रभर नावलौकिक केले आहे. या यशाबद्दल खेळाडूंचे महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे सचिव मिनाक्षी गिरी, नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वरआप्पा चौधरी, उपाध्यक्ष संतोष वसईकर, सचिव संदीप खलाणे, सहसचिव हर्षबोध बैसाणे, योगेश निकुंभ व शरीफ शेख आदींनी कौतुक केले.
Batman tanish bol
Andar17 match