भाजपाच्या पेनड्राईव्हपेक्षा मोठा बॉम्ब फोडणार: नाना पटोले

0

मुंबई,दि.27: भाजपाच्या पेनड्राईव्हपेक्षा मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. एकीकडे सामान्यांसाठी मंत्रालय प्रवेशाकरता निर्बंध आणले जातायेत तर दुसरीकडे दलालांचा मात्र मंत्रालयात मुक्त संचार आहे असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. मंत्रालयजवळच्या निर्मल बिल्डींगमध्ये या सरकारचा सर्वात मोठा दलाल बसतो, या दलालाचं रेकॉर्डिंग काँग्रेसकडे असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या अधिवेशनात भाजपाच्या पेन ड्राईव्हपेक्षा मोठा बॉंब फोडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. नाना पटोले यांचा इशारा भाजपच्या कोणत्या नेत्याकडे आहे याची राजकीय चर्चा आता सुरू आहे.

भाजपाच्या पेनड्राईव्हपेक्षा मोठा बॉम्ब फोडणार: नाना पटोले

राज्यातल्या कामांचं कंत्राट कुणाला द्यायचं हे मंत्रालयाजवळच्या निर्मल बिल्डिंगमध्ये ठरत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, राज्यातल्या मोठ्या कंत्राटांच्या मोठ्या रकमा याच निर्मल इमारतीतून ठरतात. कंत्राट कोणाला द्यायचं हे ही निर्मल इमारतीतल्या याच दलाला कडून ठरवलं जातं. निर्मल बिल्डिंगमधल्या या दलालाचा पर्दाफाश येणाऱ्या अधिवेशनात काँग्रेस करणार आहे. भाजपाच्या पेनड्राईव्ह बॉम्बपेक्षाही काँग्रेस मोठा बॉम्ब टाकणार.

नाना पटोलेंनी केलेले आरोप आणि त्यांचा इशारा कुणाकडे आहे याची राजकीय चर्चा आता चांगलीच रंगल्याचं दिसून येतंय. तसेच नाना पटोले यांच्याकडे नेमके काय रेकॉर्डिंग आहेत आणि नेमके काय पुरावे असण्याची शक्यता आहे याबद्दलही चर्चा सुरू आहे.

राज्यातल्या महायुतीच्या सरकारवर टीका करताना नाना पटोले यांनी या तीन पक्षांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, पहिला मुख्यमंत्रीपदापर्यंत कोण पोहोचतंय याची शर्यत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये लागली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here