Mumbai Corona | या शहरात कोरोना रूग्ण संख्येत वाढ, महापालिका अलर्ट!

0

मुंबई,दि.२०: Mumbai Corona | कोरोनाचे रूग्ण पुन्हा एकदा आढळून येत आहेत. कोरोनाच्या तीन लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोरोनामुळे भारतात लॅाकडाऊन जाहीर करण्यात आला होता. चीनसह सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि काही देशांमध्ये कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईतही मे महिन्यापासून रुग्णसंख्या वाढल्याने टेन्शन वाढले आहे. 

मुंबई महानगरापालिकेच्या क्षेत्रात 53 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांची प्रकृती यापूर्वीच गंभीर होती. त्यातील एकाला कर्करोगाचा आजार होता तर दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम होते. हे दोन्ही रुग्ण मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल होते. (Mumbai Corona News Today)

Mumbai Corona | महापालिका अलर्ट! 

मुंबईभरात 53 रुग्ण असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केल्यामुळे पालिका ‘अलर्ट’ झाली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास सुविधेसाठी अंधेरीच्या सेव्हन हिल्स आणि चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात 112 बेड तैनात करण्यात आले आहेत. तर लक्षणे असल्यास आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, स्वतःला इतरांपासून दूर ठेवा अशी नियमावलीच पालिकेने जाहीर केली आहे.

Mumbai Corona
Mumbai Corona

कोरोनाचा तीन लाटांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला, तर लाखो जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे मुंबईत रुग्णवाढ झाल्यास खबरदारी घेण्यासाठी पालिकेने नियमावली जाहीर केली आहे. शिवाय नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नियमावली 

  • लक्षणे असल्यास सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे.
  • इतरांपासून अंतर राखणे,
  • साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे,
  • योग्य आहार व आराम करणे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here