आमदार विजयकुमार देशमुख यांचा नागरी सत्कार

0

सोलापूर,दि.३०:  जय भारत नवरात्र महोत्सव तरुण मंडळ संचलित नवदुर्गा माता मंदीर व हिंद माता तरूण मंडळ तसेच जगदीश व्हंड्राव मित्र परिवाराच्या वतीने शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक हे सलग ५ व्यांदा  आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. प्रारंभी श्री नवदुर्गा मातेचे पूजन करण्यात आले. 

सत्काराला उत्तर देताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की, या निवडणुकीत कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करण्यात आला होता परंतु मला शहर उत्तरच्या सर्व नागरिकांवर विश्वास होता. सर्व नागरिकांच्या व सर्व लाडकी भगिनींचा जोरावर व आशीर्वादाने व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने मी ५ व्यांदा  निवडून येऊ शकलो. काम करणाऱ्यांच्या पाठीमागे जनता तर असतेच या भागात जगदीश व्हंड्राव यांचा कार्य हे तुमच्या उपस्थितीने कळतेच यांच्या पाठीमागे आम्ही व आमचे पक्ष खंबीर पणे उभे आहोत.

नरेंद्र काळे काळे म्हणाले की, माणूस कर्तुत्वाने मोठा होतो कार्याने मोठा होतो म्हणूनच कामाच्या जोरावर व कार्यकर्त्यांच्या जोरावर तसेच तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मालक ५ व्यांदा आमदार झाले. आत्ता कामं करण्याची वेळ आमची आहे. जगदीश व्हंड्राव हे या भागात अनेक उपक्रमाच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या संपर्कात असतात काम करणाऱ्याच्या पाठीमागे आमदार  तर आहेतच मी व आमचा पक्ष देखिल जगदीश व्हंड्राव यांच्या पाठीशी खंबीपणे उभे आहोत.  

राजकुमार पाटील म्हणाले की गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थावर नगरसेवक नसताना देखिल आमदार देशमुख यांच्या सहकाऱ्याने प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्व कामे करण्याचे प्रयत्न आम्ही केला आहे. या भागातच नाही तर शहर उत्तरमध्ये फक्त दहा टक्के कामे राहिले असतील, ते पण आम्ही पूर्ण करू. ह्या कामाच्या जोरावर मालक मताधिक्याने निवडून आले आहेत, जगदीश व्हंड्राव सारखे सोबती आमच्या सोबत असल्याने आम्ही तलागळा पर्यंत पोहचलो.

 

तसेच सोम आस्था दिनदर्शिका प्रकाशन आ विजय देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष नरेंद्र काळे व पत्रकार विजयकुमार पिसे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पत्रकार विजयकुमार पिसे यांना पुणे येथील जिव्हेश्वर प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या वेळी सिद्देस्वरन नाडार, राजकुमार कुर्ले, विनोद बूद्दे, नागेश स्वामी, हरी पुरुड, दत्ता बडगु, शशी अंनलदास, गोवर्धन बिल्ला,रमेश उल्लागड्डे, अरुण यादवाड, चद्रोबा कनकुर, मल्लिनाथ वारद, बसवराज हिंगमिरे, सिध्दाराम मठपती, सुरेश जामादार, हेमंत तुगावे, अशोक कल्लशेट्टी, चंद्रकांत कल्लशेट्टी,भीमाशंकर पदामगोंडा, नागेंद्र धनुरे, नारायण सुरवसे, शेखर सुरवसे, यशवंत चव्हाण, गणेश पसारगे, सुभाष कल्लशेट्टी व भागातील महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्येक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धनुरे, अप्पासाहेब पसारगे, अप्पासाहेब पटणे, नरेंद्र होमकर, बाळासाहेब वाघमोडे, राजेश हवले, राजेश बुद्दे पियूष शहा आदींनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here