नवी दिल्ली,दि.30: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पार्टी जिंकल्यास, दिल्लीतील मंदिरांचे पुजारी आणि गुरुद्वारा साहिबच्या ग्रंथींना प्रति महिना ₹ 18,000 मानधन दिले जाईल. अशी घोषणा केजरीवाल यांनी केली.
ही योजना समाजासाठी त्यांच्या अध्यात्मिक योगदानासाठी आणि आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना सन्मान आहे. भाजपवाले, हे थांबवण्याचा प्रयत्न करू नका, मोठे पाप लागेल असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल म्हणाले, आम्ही राज्यात पुरोहितांसाठी सन्मान योजना सुरू करत आहोत. अनेक शतकांपासून पुजारी देवाची पूजा करतात, आपली परंपरा चालवत आले आहेत. आतापर्यंत आपण पुजाऱ्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. आता या योजनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत.