जालना,दि.31: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी नवा इशारा दिलाय. विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC मधून आरक्षण दिले नाही तर उद्यापासून पाणी सोडणार असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आंदोलकांना आंदोलन करु द्या. गुन्हा दाखल केला तर मी येथून उठून बीडमध्ये कलेक्टर यांच्या समोर जाऊन बसेन मग तिकडे 10 लाख कार्यकर्ते येतील की किती येतील ते मला माहित नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ यांना दिला आहे.
संचारबंदीला विरोध
बीड मधील संचारबंदीला मनोज जरांगे यांनी विरोध केला आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत. आमची आंदोलन मोडीत काढू नका. बीडमध्ये जातीयवादी अधिकारी आहेत. अधिकारी जातीयवादी नसले पाहिजेत. 144 बंदी हटवा. आंदोलन थांबू नका. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आंदोलकांना त्रास झाला तर आम्ही देखील त्रास देऊ मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी नवा इशारा दिलाय. विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या.. आज रात्री किंवा उद्या मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय घेतला नाही तर उद्यापासून पूर्ण पाणी बंद करणार असा इशारा जरांगे-पाटलांनी दिलाय. मराठ्यांना कुणबीतून आरक्षण दिल्यामुळे ओबीसी आंदोलन करणार असतील तर बघू. असा आक्रमक पवित्राही जरांगेंनी घेतलाय. त्यामुळे सरकारसमोर आता नवं आव्हान उभं ठाकलं आहे. जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करत होते. मात्र विशेष अधिवेशनानं हा प्रश्न सुटू शकत नसल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलीय.