सोलापूर,दि.23: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी जि. जालना येथे सुरू केलेल्या उपोषणास समर्थन देण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कुर्डूवाडी शहर, कुर्डू, भोसरे गावात कडकडीत उस्फूर्त बंद पाळण्यात आला.
मराठा समाज बांधव सोमवारी दुपारी 11 वाजता कुर्डूवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपतींच्या व शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मराठा बांधव प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसीतून 50 टक्केच्या आत आरक्षण मिळावे, शासनाने मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढावा, मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्यावे आणि हैदराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावत चाललेली असून त्यांनी ज्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडे मांडल्या आहेत. त्या शासनाने तात्काळ मंजूर कराव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हा बंद यशस्वी करण्यासाठी मराठा समन्वयक संजय टोणपे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, सुरेश बागल, बाबासाहेब गवळी, वाहिद शेख, दत्ता काकडे, अरुण काकडे मच्छिंद्र कदम, शिवाजी गवळी, दत्तात्रय जगताप, पप्पू भोसले, प्रमोद बागल, निलेश देशमुख, प्रशांत जगताप, अमरसिंह भोरे, शहानवाज शेख, बाळासाहेब बागल, अरुण काकडे, शामराव बोराडे, चंद्रकांत गवळी, हरिभाऊ बराटे, हरिभाऊ बागल, संदीप भराटे संजय गोरे, दिनकर टोणपे, दत्ताजी गवळी, धनंजय भोसले, सौरभ भोसले, हनुमंत कडबाने, गणेश कदम, प्रदीप पाटील, शंकर उबाळे, टी आर पाटील, बालाजी जगताप, रमेश परबत, नामदेव ढेकळे, विनायक राऊत, शहाजी गवळी, अनिल बागल, ॲड अशोक पाटील, अजित सुराणा, सतीश बागल, बाबुराव चव्हाण, महादेव बागल, प्रशांत गायकवाड, राजकुमार देशमुख, ॲड आडकर, गणेश बागल, निलेश गवळी, उल्हास पाटील, सतीश महींगडे, अनिल गवळी, प्रदीप टोणपे, दत्ता रेडे, पिंटू पवार, पंडित आवताडे, नितीन आवताडे, नानासाहेब पाटील, राजू टोणपे, सचिन बर्डे, प्रमोद घाडगे, संदीप पाटील, लक्ष्मण बागल, वैभव बागल, धनू कदम, गणेश कदम आदींनी परिश्रम घेतले.