Maharashtra Politics: जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा

0

मुंबई,दि.3: Maharashtra Politics: शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. आता पक्षात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. जयंत पाटलांनी NCP प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे.

शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केलानंतर नेत्यांसह कार्यकर्ते निराश झाल्याचं दिसून येत होतं. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या राजीनामा सत्रानंतर हा गोंधळ अधिक वाढल्याचं दिसून येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here