मुंबई,दि.26: मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मराठा वादळ आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले आहे. माझा मराठा समाजा इथे न्यायासाठी आला आहे. आमच्या मराठा समाजाला वाईट वागणूक दिली तर महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना घरात न राहात मुंबईत धडक द्या. आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करु नका. अध्यादेश दिला तर आझाद मैदानात जाणार नाही. पण नाही दिला तर आझाद मैदानात धडक देणार असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे सरकारकडे रात्रीपर्यंतचा वेळ दिला.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा लाखोंचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे. नवी मुंबईतील वाशी येथे मनोज जरांगे यांचा भव्य मोर्चा दाखल झालाय. हा भव्य मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झाला तर राज्य सरकारपुढे अडचणी वाढू शकतात. संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारच्या शिष्टमंडळाने आज जरांगे पाटील यांची वाशी येथे जाऊन भेट घेतली.
मनोज जरांगे पाटील यांना या शिष्टमंडळाने राज्य सरकारचा मराठा आरक्षणाबाबतचा नवा जीआर दाखवला. या नव्या जीआरमध्ये सर्व मागण्यांची पूर्तता करण्यात आल्याची माहिती समोर येत होती. मनोज जरांगे यांनी जीआर वाचून मराठा समाजाच्या तज्ज्ञांसोबत चर्चा केली. त्यानंतर ते लाखो मराठा बांधवांच्या समोर आले. त्यांनी सर्वांसमोर सरकारचा जीआर वाचून दाखवला. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहाणार नाही, मराठावाडा हा सगळा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आता आजच्या रात्रीत सगेसोयरे अध्यादेश द्यावा, कायद्याचं सन्मान करुन आम्ही आझादा मैदानात जात नाही आजची रात्र इथेच काढतो आम्हाला मुंबईत यायची हौस नाही. पण आज संध्याकाळपर्यंत अध्यादेश द्या.
मराठा बांधवांवर टाकण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे तस लेखी पत्र दिले नाही ते पत्र त्यांनी द्यावे, मराठा समाजाला 100 टक्के मोफत आरक्षण मिळावं, मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती करू नका नोकरीत भरती करायची असेल तर मराठ्यांसाठी जागा रिक्त सोडा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
तात्काळ प्रमाणपत्र घ्या नंतर तपासणी करा
शिंदे समिती रद्द करणार नाही, त्याची मुदत दोन महिने वाढवली आहे. टप्प्यटप्प्याने वर्षभर मुदत वाढवली जाणार आहे. ज्याची नोंद नाही मिळाली त्याच्या गणगोताच्या नोंदीवर प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी होती. यावर ज्याचे संगेसोयरे यांना जर प्रमाणपत्र मिळावे तर त्याचा शपथपत्र घ्यावे आणि तात्काळ प्रमाणपत्र द्या नंतर त्याची तपासणी करा असं जरांगेंनी सांगितलं आहे.
नोकरभरती नको
आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरभरती करायची नाही, जर भरत्या करायच्या असल्या तर मराठ्यांच्या जागा राखीव ठेवून करायच्या अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली. यावर सरकारची बाजूही त्यांनी आंदोलकांपुढे मांडली.