‘मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे…’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

कोल्हापूर,दि.5: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय भुवया उंचावल्या आहेत. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन असा नारा फडणवीस यांनी दिला आहे.

मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत. चंदगडमध्ये (Chandgad) बोलताना ते म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंदगडमधील निट्टूर गावात हे वक्तव्य केले. सीमाभागात दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी नरसिंह मंदिराला अचानक भेट दिली.

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या आग्रहाखातर भगवान श्री नृसिंह जयंतीचे औचित्य साधून फडणवीस चंदगड तालुक्यातील निट्टूर (ता.चंदगड) येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसंच निट्टूर येथील नृसिंह मंदिर परिसराच्या विकासासाठी लवकरच आराखडा तयार करुन निधी उपलब्ध करुन देणार अशी घोषणा केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी शिवाजीराव पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच चंदगडला पुन्हा एकदा येणार असल्याचे सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here