अक्कलकोट,दि.३: प्रसिध्द विधिज्ञ ॲड. शरदराव जाधव (फुटाणे) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून श्री राजेराय मठाचे अध्यक्ष प्रसिध्द विधिज्ञ अॅड. शरदराव जाधव (फुटाणे) यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, अँड. विकास जाधव, न्यासाचे विधिज्ञ अँड. संतोष खोबरे, अभियंता अमित थोरात, प्रा. प्रकाश सुरवसे, न्यासाचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत भगरे, सह. जनसंपर्क अधिकारी सोमशेखर जमशेट्टी, महांतेश स्वामी, संतोष जाधव, सुखदेव चव्हाण हे उपस्थित होते.