सोलापूर,दि.5: Jayraj Nagansure: नायब तहसीलदार अजयकुमार गेंगाणे यांची पगारापेक्षा संपत्ती जास्त असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) यांनी दिली आहे. सोलापूर शहर उत्तरचे तत्कालीन मंडल अधिकारी अजयकुमार गेंगाणे सध्या हवेली येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.
अजयकुमार गेंगाणे शहर उत्तरचे मंडल अधिकारी असताना अनेक भ्रष्टाचार करून बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे, असा आरोप जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) यांनी केला आहे. सोलापूर येथे मंडल अधिकारी म्हणून ते चार वर्षे कार्यरत होते. त्यांना महिना 40 हजार पगार धरला तरी वर्षाकाठी त्यांना चार लाख 80 हजार रुपये पगारापोटी मिळत होते. चार वर्षे त्यांनी मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असताना एकूण त्यांना 19 लाख 20 हजार रुपये पगारातून उत्पन्न मिळाले आहे असे असताना त्यांनी पावणेतीन कोटी रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. असा गंभीर आरोप जयराज नागणसुरे यांनी केला आहे.
तसेच त्यांची मुलगी युक्रेन मध्ये उच्च शिक्षण घेत आहे. तिला वर्षाकाठी 15 लाख रुपये खर्च आहे. तर सर्वसामान्यांचे मुंड्या मुरगळून सर्वसामान्यांना वेठीस धरून लाच घेऊन असे अधिकारी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता गोळा करतात त्यांची चौकशी होत नाही. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे (Jayraj Nagansure) यांनी लोकायुक्तकडे तक्रार केल्यानंतर अजयकुमार गेंगाणे चौकशी सुरू झाली. त्यानंतर भ्रष्ट मंडल अधिकारी सध्या हवेली येथे नायब तहसीलदार म्हणून असलेले अजय कुमार गेंगाणे यांची आयकर विभागाकडे चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी केली आहे.
जयराज नागणसुरे यांनी आयकर अधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज करताना ज्ञात उत्पन्न स्तोत्रापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात संपत्ती गोळा केली असल्याने आयकर अधिकारी आयकर कायदा कलम 133 प्रमाणे माहिती मागू शकतात. भ्रष्ट अधिकाऱ्याची माहिती मागवली तर नक्कीच त्यांना उत्पन्न लपवले होते. याची निश्चिती होईल कलम 131 आयकर कायदा नुसार आपण त्यांच्या संपत्तीचा शोध घेऊन या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी केली आहे.