सोलापूर,दि.25: सोलापुरातील माजी नगरसेवकाचा आपत्तीजनक स्थितीतील व्हिडीओ समोर येणार आहे. हा माजी नगरसेवक अश्लील कृत्य करताना त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. याबाबत जयराज नागणसुरे यांनी ‘सोलापूर वार्ताला’ माहिती दिली आहे. नागणसुरे म्हणाले तो माजी नगरसेवक तरूणीशी अश्लील कृत्य करताना कॅमेरात कैद झाला आहे. असा दावा नागणसुरे यांनी केला आहे. या दाव्याच्या सत्यतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.
त्या माजी नगरसेवकाने पदाचा गैरवापर करत तरूणीवर अत्याचार केल्याची शक्यता आहे असे नागणसुरे यांचे म्हणणे आहे. नागणसुरे यांनी नुकतेच भाजपा आमदारावर शासन निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
आमदार विजयकुमार देशमुख यांच्याबाबत नागणसुरे यांनी तक्रार दिल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासन निधी गैरवापर प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, सोलापूरकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या कथित शासन निधी गैरवापर प्रकरणाची चौकशी नगर परिषद प्रशासन संचालनालयाने सुरु केली आहे.
आता नागणसुरे यांनी त्या नगरसेवकाचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे. हा व्हिडिओ लवकरच पत्रकार परिषदेत दाखवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जयराज नागणसुरे यांनी खळबळजनक दावा केल्यानंतर आता ते कधी हा व्हिडीओ समोर आणणार हे पाहणे महत्वाचे आहे. सोलापूरसह राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशातच या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
अस्वीकरण: बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.
Disclaimer: Solapur Varta Does Not Guarantee The Truth Of The Claim Made By Jairaj Naganasure.