शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांचे निवडणूक निकालावर मोठं वक्तव्य 

0

मुंबई,दि.21: शिवसेना (शिंदे गट) नेते गजानन कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत मोठं वक्तव्य केले आहे. कीर्तिकर यांनी ‘एबीपी माझा’शी खास संवाद साधला. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली होती. वडील एका पक्षात आणि मुलगा प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवार अशी परिस्थिती निर्माण झाली. 

दोन पक्ष फुटल्यानंतरची ही निवडणूक अटीतटीची असून जनमतानंतर खरा कोण आणि खोटा कोण हे दिसून येईल, असे गजानन कीर्तिकर ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाले. शिवसेना शिंदे गटात गेल्याने आपण एकाएकी पडलो असेही ते म्हणाले. अमोल ना नगरसेवक, ना आमदार तर डायरेक्ट खासदार होणार असं मोठं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलं.

राज्यात महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशी लढत झाली. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व काँग्रेस तर महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे प्रमुख पक्ष होते. 

गजानन कीर्तिकर यांचे निवडणूक निकालावर मोठं वक्तव्य

राज्यातील निवडणूक निकालावरही गजानन कीर्तिकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राज्यात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी उमेदवार दिले आहेत ते पाहता महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार असल्याचा अंदाज गजानन कीर्तिकरांनी व्यक्त केला.  अमोल कीर्तिकर खासदार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here