ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणचा व्हिडीओ शेअर करत निलेश लंके यांनी केला गंभीर आरोप

0

अहमदनगर,दि.22: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अहमदनगर लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणचा व्हिडीओ शेअर करत गंभीर आरोप केला आहे. निलेश लंके यांनी X वर व्हिडीओ पोस्ट केला आहे. ईव्हीएम मशीनवरून आधीच अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना लंके यांनी व्हिडीओ पोस्ट करत आरोप केले आहेत. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे. 

ZEE 24 तासने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रामध्ये मतदान केल्यानंतर मतमोजणीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाण सीसीटीव्हीच्या कनेक्शनबरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा निलेश लंके यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये मतदानानंतर ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या गोदामातील असल्याचा दावा लंके यांनी केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक इसम गोदामाच्याबाहेरील बाजूला असलेल्या यंत्रणेमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ अवघ्या 8 सेकंदांचा आहे. व्हिडीओत एक व्यक्ती सीसीटीव्ही यंत्रणा असलेल्या बॉक्सला हात लावून मोबाईलवर काहीतरी पाहत पुढे निघून जाताना दिसतेय. 

निलेश लंके काय म्हणाले?

निलेश लंके म्हणाले, ‘संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय.. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतय.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here