Gadar 2: ‘गदर 2’ सिनेमाचा दमदार टिझर रिलीज, ‘दामाद है वो पाकिस्तान का…’

0

मुंबई,दि.12: Gadar 2: 2001मध्ये आलेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमा सुपर हिट ठरला. अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या अभिनयानं भरलेला या सिनेमाचा सिक्वेल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सकिना आणि तारा सिंगची प्रेमकथा आता ‘गदर 2’ मधून पाहायला मिळणार आहे. 11 ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. त्याआधी सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाच्या सिक्वेलची प्रेक्षक अतूरतेनं वाट पाहत असताना निर्मात्यांनी सिनेमाचा टीझर भेटीला आणला आहे.

‘गदर 2’ सिनेमाचा दमदार टिझर रिलीज | Gadar 2

“दामाद है वो पाकिस्तान का, उसे नारियल दो, वरना दहेजमें पाकिस्तान ले जाएगा” या दमदार डायलॉगनं टीझरची सुरूवात होतेय. त्यानंतर सनी देओल तारा सिंगच्या रुपात एंग्री यंगमॅन होऊन लाहोरमध्ये धमाकेदार एंट्री घेतो. यावेळी सनी देओल हँडपंपच्या ऐवजी मोठा कार्ट व्हील घेऊन रागात दुष्मनांशी दोन हात करताना दिसतोय. “तारा सिंग इज बॅक” असं ठसठशीत शब्द स्क्रिनवर येतात आणि टीझर पुढे सरकतो. ट्रेलरच्या शेवटी तारा सिंग स्मशानभूमीत रडताना दिसतोय आणि मागे सिनेमाचं आयकॉनिक गाणं ‘घर आजा परदेशी…’ वाजताना दिसत आहे.

‘गदर 2’ चा ट्रेलर येण्याआधीच ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमा नव्या एडिटिंगसह प्रेक्षकांसाठी रिलीज करण्यात आला आहे. पालमपुर, अहमदनगर, लखनऊ सारख्या लोकेशनवर सध्या गदर 2चं शुटींग सुरू आहे. पालमपुरच्या भलेड गावात सिनेमाच्या शुटींगला सुरूवात झाली. पाकिस्तानमधली सीन शुट करण्यासाठी लखनऊमधील la martiniere collegeमध्ये शुट करण्यात आलं. इथेच सिनेमाचा क्लायमॅक्स देखील शुट करण्यात आला आहे. त्यानंतर सिनेमातील काही सीन्स हे मध्यप्रदेशच्या इंदूर आणि मांडू येथील आहेत.

गदर 2मध्ये तारा सिंग आणि त्याचा मुलगा चरणजीत बाप-लेकाच्या नात्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’मध्ये दाखवण्यात आलेला छोटा जीत म्हणजेच अभिनेता उत्कर्ष शर्माच गदर 2मध्ये त्यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. उत्कर्ष आता मोठा झाला असून त्याला पुन्हा जीतच्या भूमिकेत पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 1971मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाभोवती फिरणारी ही गोष्ट 20वर्ष पुढे सरकणार आहे. यावेळी तारा सिंग आपली पत्नी सकिना नाही तर मुलाचा जीव वाचवण्यासाठी सीमापार जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here