Home क्राइम सायबर चोरांची भलतीच मजल; थेट पोलीस निरीक्षकांनाच फसवण्याचा प्रयत्न झाला उघड!

सायबर चोरांची भलतीच मजल; थेट पोलीस निरीक्षकांनाच फसवण्याचा प्रयत्न झाला उघड!

0

सोलापूर,दि.१३: वाहनांच्या वाहतूक दंडाचा (Traffic Penalty) खोटा संदेश पाठवून वाहनधारकांची बँक खाती रिकामी करणारी एक नवीन सायबर फसवणुकीची पद्धत (Cyber Scam) समोर आली आहे. विशेष म्हणजे, या भामट्यांनी थेट सोलापूर सायबर गुन्हे शाखेचे (Cyber Crime Branch) पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनाच असा मेसेज पाठवून जाळ्यात ओढण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, सायबर गुन्ह्यांची संपूर्ण माहिती व सतर्कतेमुळे पोलीस निरीक्षक ढवळे यांनी तो संदेश उघडला नाही आणि संभाव्य फसवणूक टळली.  

कशी केली जाते फसवणूक? (Modus Operandi)

बनावट संदेश (Fake Message): भामटे वाहनधारकांना ‘वाहन इन्फो’ (Vahan Info) या नावाने मेसेज पाठवतात.  

 गाडीचा खरा क्रमांक (Vehicle Number): या मेसेजमध्ये चालकाच्या वाहनाचा खरा नोंदणी क्रमांक नमूद केलेला असतो, जेणेकरून चालकाला तो मेसेज खरा वाटेल.  

 चलन थकीत असल्याचे प्रलोभन/भीती: संदेशात ‘चलाण प्रलंबित’ (Challan Pending) असे लिहून खाली ‘चेक डिटेल्स इन वन टॅप’ (Check Details in One Tap) आणि लाल रंगात ‘चेक डिटेल्स’ (Check Details) असा पर्याय/लिंक (Link) दिलेली असते.  

 एका क्लिकवर खाते रिकामे: वाहनचालकाने भीतीपोटी किंवा उत्सुकतेने त्या लिंकवर क्लिक करताच, सायबर गुन्हेगार संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर डल्ला मारतात (Hack/Fraud).  

नागरिकाचे २८ हजार लुटले

पोलीस निरीक्षक ढवळे यांची गाडी प्रत्यक्ष घरीच उभी होती आणि तिच्यावर कोणतेही चलन प्रलंबित नव्हते. तरीही त्यांना असा मेसेज पाठवण्यात आला होता.  

नुकतीच एक पीडित व्यक्ती अशीच तक्रार घेऊन पोलीस निरीक्षक ढवळे यांच्याकडे आली होती. या तक्रारदाराने आलेला बनावट ई-चलानाचा मेसेज उघडला असता, त्याच्या बँक खात्यातील तब्बल २८ हजार रुपये सायबर चोरांनी लंपास केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.