शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांची मोठी घोषणा 

0

जळगाव,दि.18: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मोठी घोषणा केली आहे. एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात भाजपा वाढवण्यासाठी जोरदार केले होते. अलीकडेच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्यांनी भाजपाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत (शरद पवार गटात) 2020 ला प्रवेश केला. जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघांतून सहा वेळा आमदार म्हणून निवडले गेलेले एकनाथ खडसे यांनी यंदाच्या निवडणुकीत कन्या रोहिणी खडसे यांना जिंकवून देण्यासाठी जनतेकडे अपील केलं आहे. 

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एकनाथ खडसे यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच यावेळी भावनिक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल, असे म्हणत त्यांनी मुलगी रोहिणी खडसे हिला विजयी करण्याचे आवाहन केले.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करीत एकनाथ खडसे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे भाजपमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीत रावेरमधून विजयी झाल्यानंतर रक्षा खडसे यांना मोदी 3.0 मध्ये मंत्रिपद देण्यात आलं होतं. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर एकनाथ खडसे हे शरद पवारांसोबत आहेत. त्यांची कन्या रोहिणी खडसे शरद पवार गटाकडून मैदानात उतरल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती आणि यात त्यांना पराभव पाहावा लागला होता. 

व्हिडिओत एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, मी नाथाभाऊ बोलत आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक आहे. गेल्या कित्येक वर्षांच्या राजकारणात मी चांगल्या-वाईट परिस्थितीत जात-धर्म न पाहता मदत केली आहे. सध्या माझी प्रकृती ठीक नसते. त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये मी असेल किंवा नसेल. मला जसं आपण सहकार्य केलं तसंच रोहिणी खडसे यांना सहकार्य करावं. यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा माझा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्षे मी आपल्या सोबत आहे. गेली अनेक वर्षे तुम्ही मला सहकार्य केलं आहे. कोणताही जात धर्म न पाहता सर्वांना मदत करण्याची भूमिका मी आजपर्यंत पार पाडली आहे. तब्येतीमुळे पुढची निवडणूक मी पाहिल किंवा नाही. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here