मुंबई,दि.24: भाजपा नेते राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्याम मानव यांना इशारा दिला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला होता. त्यांना एक वर्षापेक्षा जास्त वेळ जेलमध्ये राहावं लागलं. अनिल देशमुख यांच्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर खोटे आरोप लावण्यासाठी दबाव होता. असे आरोप श्याम मानव यांनी केले.
100 कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरेंचं नाव घ्या आणि अॅफेडेव्हिटवर सही करा, आदित्य ठाकरेंचं दिशा सालियान प्रकरणात नाव घ्या, तुमची ईडी कारवाईतून सुटका करू अशी ऑफर अनिल देशमुखांना दिल्याचा दावा श्याम मानव यांनी केलाय. तर श्याम मानवांनी जे सांगितलं ते सत्यच आहे. आदित्य, उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव होता. 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी एक माणूस पाठवून अॅफिडेव्हीट पाठवले होते, असा म्हणत देशमुखांनी श्याम मानवांच्या दाव्यांना दुजोरा दिलाय.
आता अनिल देशमुख यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी आपल्याला धमकी दिली होती, असा मोठा आरोप प्रवीण मुंढे यांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता, असा धक्कादायक आरोप प्रवीण मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांचादेखील जबाब सीबीआयकडून नोंदवला गेला होता. मुंढे यांनी आपल्या जबाबात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मी कधी कोणाच्या नादी…
श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी असे आरोप करण्याआधी मला विचारयला हवं होतं. अलीकडच्या काळात सुपारीबाज घुसले आहेत. माझा सिद्धांत पक्का आहे, मी कधी कोणाच्या नादी लागत नाही आणि नादी लागलो तर सोडत नाही. माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. त्यात ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिव वाझे यांच्याबद्दल काय बोलतायेत याची रेकॉर्डिंग आहे. पण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही. पण मी पुराव्याशिवाय बोलत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.