नाशिक,दि.५: Car Accident Nashik | एका लग्नसमारंभानंतर परतणाऱ्या कुटुंबीयांच्या कारचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. नामपूर (Nampur) येथील भदाण कुटुंब नाशिकमध्ये नातेवाईकाच्या लग्नसमारंभातून परतत असताना भरधाव कार थेट बंगल्यात घुसली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. नाशिक-कळवण महामार्गावर हा अपघात झाला आहे.
भदाण कुटुंबातील सदस्य लग्नसमारंभानंतर परतत असताना बुधवारी रात्री १० वाजता हा कार अपघात झाला. अपघातात नामपूर आणि देवळा येथील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार नाशिक-कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ एका बंगल्यात जाऊन घुसली. बंगल्याबाहेरील असलेला सिमेंट खांब वाकून कार आत घुसली. त्यावरून हा अपघात किती भीषण होता हे समोर येते. (Accident News Nashik)
या अपघातात चालक खालिक मेहमूद पठाण (५०) रा. नामपूर, ता. सटाणा तसेच माधवी मेतकर (३२) आणि त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर (०४) रा. देवळा, शैला वसंत भदाण (६२) आणि त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदाण (५०) हे जागीच ठार झाले. तर उत्कर्ष मेतकर (१२) रा. देवळा आणि भालचंद्र भदाण (५२) रा. नामपूर हे गंभीर जखमी झाले.