सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0

सोलापूर,दि.16: सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुका वगळून उर्वरित अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, माढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस व करमाळा या 10 तालुक्यातून प्रत्येक तालुक्यास गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत एक गोशाळा अनुदानासाठी निवड करण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. तरी या 10 तालुक्यातून पात्र गोशाळांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी 10 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. सी. बोरकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत…

योजनेचा उद्देश, गोशाळा निवडीच्या अटी व शर्ती, लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज, अनुषंगिक कागदपत्रे इ. सर्व बाबी तालुकास्तरावर संबंधित पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार), यांच्याकडे उपलब्ध आहेत.

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र

इच्छुकांनी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधून विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आपल्या संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे दि.19/07/2023 पर्यंत सादर करावेत. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे थेट सादर केलेले तसेच ई-मेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच, यापुर्वी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत सादर करण्यात आलेले अर्ज सादर कलेले ग्राह्य धरले जाणार नसल्याने इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे, असे पत्रकात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here