Ayodhya Poul: ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक आणि मारहाण

0

ठाणे,दि.17: Ayodhya Poul: ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ (Ayodhya Poul) यांच्यावर शाईफेक करण्यात आली. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. कळव्यातील मनिषा नगर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त एक खासगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या खासगी कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांनाही बोलवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

हेही वाचा Dharmraj Kadadi: श्री सिध्देश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांचा मोठा निर्णय

अयोध्या पौळ पाटील यांनी व्हिडिओ केला ट्वीट | Ayodhya Poul

मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो शिवसैनिक माझ्या सोबत होता. लढण्याची ताकद तुम्ही दिली सर्वांनी.

एक एक करुन व्हिडिओ समोर येत आहेत ते सोशल मीडियावर शेअर करेनच आणि घडलेला प्रकार तुम्हा सर्वांच्या पुढे मांडेन. असं म्हणत अयोध्या पौळ पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

काय घडली घटना?

ठाकरे गटाच्या समाजमाध्यम राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांच्यावर ठाण्याजवळील कळवा भागात शाईफेक झाल्याचा प्रकार शुक्रवार रात्री उघडकीस आला. काही महिलांनी ही शाई फेक केली असून या प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया कळवा पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत सुरू होती. ठाकरे गटाच्या समाजमाध्यम राज्य समन्वयक अयोध्या पौळ या ट्विटर या माध्यमातून विरोधकांवर टीका करत असतात. शुक्रवारी खासगी कार्यक्रम कळवा येथील जय भीम नगर परिसरात आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी अयोध्या या आल्या होत्या. त्यावेळी काही महिलांनी त्यांना घेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केली. या प्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात येत असून पोलीस महिलांनाचा शोध घेत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here