Asaduddin Owaisi On Pak | AIMIM प्रमुख असद्दुदीन ओवैसी यांची पाकिस्तानवर बोचरी टीका 

0
Asaduddin Owaisi On Pak

सोलापूर,दि.१४: Asaduddin Owaisi On Pak | AIMIM प्रमुख असद्दुदीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. ओवैसी हे पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) सातत्याने पाकवर मोठी कारवाई करावी अशी मागणी करत आहेत. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना शहीद दर्जा देण्यात यावा अशी मागणीही ओवैसी यांनी केली होती. पाकिस्तानच्या विरोधात असद्दुदीन ओवैसी यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. 

Asaduddin Owaisi On Pak

असद्दुदीन ओवैसी (Asaduddin Owaisi Latest News) यांनी पाकिस्तान आणि चीनवर टीका केली आहे. भारत-पाक तणावाच्या काळात चीनने पाकला पाठिंबा दिला होता. ओवैसी यांनी पाकिस्तानाला पुन्हा एकदा डिवचलं आहे. त्यांनी पाकिस्तानची थेट इज्जतच काढली आहे. भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला होता, यात पंजाब प्रांतातील रहीम यार खान या हवाई तळाचाही समावेश होता.  

असद्दुदीन ओवैसी यांची पाकिस्तानवर बोचरी टीका | Asaduddin Owaisi On Pak 

ओवैसी यांनी ट्विट करत पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे  नाव घेत म्हटले आहे की, . “शाहबाज सरीफ आणि असीम मुनीर चीनकडून भाड्याने घेतलेले लढाऊ विमान रहीम यार खान हवाई तळावर उतरवू शकतात का?” असा खोचक सवाल ओवैसी यांनी केला आहे. (Asaduddin Owaisi Marathi News)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here