अभिनेता शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला

0

मुंबई,दि.12: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘डंकी’ या सिनेमासाठी तो खूप उत्सुक आहे. नुकतचं या सिनेमातील तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अशातच आता ‘डंकी’च्या रिलीजआधी शाहरूख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला आहे.

शाहरूख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला

शाहरुख खानचा वैष्णो देवी दर्शनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये किंग खान आपली मॅनेजर पूजा ददलानीसोबत दिसत आहे. तसेच शाहरुखच्या चहुबाजूंनी बॉडी गार्ड्सदेखील दिसत आहेत. व्हिडीओमध्ये किंग खानने आपला चेहरा लपवला आहे. पण तरीही चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या सुपरस्टारला ओळखलं आहे.

शाहरुख खान अभिनीत ‘डंकी’ या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. राजकुमार हिरानी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘डंकी’ हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन ईरानी आणि विक्रम कोचर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 120 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘डंकी’ या सिनेमाची प्रभास आणि प्रशांत नीलच्या ‘सालार’ या सिनेमासोबत टक्कर होणार आहे.

तिसऱ्यांदा शाहरुख वैष्णो देवीच्या दर्शनाला

शाहरुख खान या वर्षात तिसऱ्यांदा वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला आहे. ‘पठाण’ (Pathaan) आणि ‘जवान’च्या (Jawan) रिलीजआधी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला होता. त्याचा ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा जानेवारी महिन्यात रिलीज झाला होता. तर ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. पठाण आण जवान या सिनेमांच्या माध्यमातून शाहरुखने जगभरात लोकप्रियता मिळाली. आता ‘डंकी’ या सिनेमाच्या माध्यमातून धमाका करण्यासाठी किंग खान सज्ज आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here