Accident On Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात

0

मुंबई,दि.२९: Accident On Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. पनवेल-पेण एसटी बसला मुंबई-गोवा महामार्गावर आज भीषण अपघात झाला आहे. निसरड्या रस्त्यामुळे एसटी बस डिव्हायर ओलांडून पलिकडे गेली. याचवेळी समोरून जेएसडब्ल्यू स्टील कंपनीची बस येत होती तिच्यावर जाऊन आदळली. यामध्ये एसटी चालक गंभीर जखमी झाला आहे. 

प्रवासी किरकोळ जखमी | Accident On Mumbai-Goa Highway

शिरढोण येथील पुलावर हा अपघात झाला आहे. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रवाशांना नजिकच्या उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. 

पावसाळा नुकताच सुरु झालेला आहे. यामुळे रस्त्यावरील माती, टायर घासून निर्माण झालेली धूळ आदी गोष्टी पुरेशा धुतल्या गेलेल्या नाहीत. यामुळे या काळात वाहने चालविताना वेगात असल्यास घसरण्याचे प्रकार घडत असतात. वाहन चालकांनी वाहने चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here