building collapsed: भिवंडीतील वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळली

0

भिवंडी,दि.२९: building collapsed: भिवंडीतील वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळली आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तीन मजली इमारत कोसळली | building collapsed

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या वलपाडा परिसरात ‘वर्धमान’ नावाची तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक गोडावून आहे. या ठिकाणी काही कर्मचारी जेवणासाठी थांबले होते. मात्र, दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही इमारत कोसळली.

दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here