Video: धक्कादायक ५० फूट उंचीवरून कोसळला आकाशपाळणा

0

दि.५: Video: ५० फूट उंचीवरून आकाशपाळणा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. पंजाबमधील मोहाली येथे एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. दसरा ग्राउंड, फेज-८ येथे मोहाली ट्रेड फेअर जत्रेदरम्यान, ड्रॉप टॉवरचा स्विंग तुटल्याने अनेक लोक जखमी झाले. जवळपास ५० मीटर उंचीवरून हा पाळणा जमिनीवर पडल्याचं सांगण्यात येत आहे. पाळणा तुटल्यावर तेथील लोक घाबरून पळू लागले. दुर्घटनेनंतर जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. हा ड्रॉप टॉवर पाळणा अतिशय वेगाने फिरत होता. अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा तोल गेला आणि भरधाव वेगात तो खाली पडला. या अपघातात महिला आणि लहान मुले गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी असलेल्या लोकांनी प्रसंगाचे भान राखत जखमींना घेऊन त्वरित रुग्णालयात धाव घेतली.

View this post on Instagram

A post shared by SolapurVarta (@solapur_varta)

या जत्रेचे आयोजक दिल्ली इव्हेंट्स कंपनीचे सनी सिंग म्हणाले की, हे कसे घडले ते आम्ही शोधून काढू. यापूर्वीही अशाप्रकारच्या विविध जत्रांचे आयोजन केले आहे, परंतु तसे झाले नाही. तरीही आम्ही याचे कारण शोधून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करू. डीएसपी हरसिमरन सिंह यांनी सांगितले की, रविवार असल्याने जत्रेत खूप गर्दी होती. ही घटना कशी घडली हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच, या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, मेळ्याची आयोजक कंपनी दिल्ली इव्हेंट्स सप्टेंबरमध्ये गुरुग्राम आणि पंचकुलामध्ये आणि डिसेंबरमध्ये चंदीगडमध्ये अशाच प्रकारचा मेळा आयोजित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here