दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य, नमाज अदा करत असतानाच निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या

0

जम्मू,दि.24: जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे. बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी सकाळी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. बारामुल्लाच्या शेरी येथील गंटमुल्ला येथे दहशतवाद्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहम्मद शफी हे गंटमुल्ला भागातील मशिदीत नमाज अदा करत असताना ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नाकेबंदी करण्यात आली आहे. मोहम्मद शफी मशिदीत अजान देत असताना या दहशतवाद्यांनी हे भ्याड कृत्य केले आणि त्यांना गोळ्या घातल्या. यादरम्यान शफी जखमी झाले आणि काहीवेळात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा दल दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनीही याबाबत ट्विट करून लोकांना या भागापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. “दहशतवाद्यांनी जेंटमुल्ला येथील निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांच्यावर गोळीबार केला. ते मशिदीमध्ये अजान पठण करत असताना त्याचा मृत्यू झाला,” अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे.

दुसरीकडे, गेल्या महिन्यात, श्रीनगरच्या ईदगाह मशिदीजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात राज्य पोलीस दलातील एक पोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाला होते. या घटनेनंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. इन्स्पेक्टर मसरूर अहमद वानी श्रीनगरच्या ईदगाह मैदानावर स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना ही घटना घडली होती.

दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये राजौरी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध सुरू झाला आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांमध्ये दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराचे मोठे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. 21 डिसेंबर रोजी ढेरा की गली आणि बाफलियाज दरम्यान धत्यार वळणावर दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर भ्याड हल्ला केला होता, ज्यामध्ये 4 जवान शहीद झाले होते. तर तीन जवान जखमी झाले होते. हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले आहेत. हे दहशतवादी घनदाट जंगलातील डोंगराच्या गुहांमध्ये लपले असण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here