सिध्देश्वर कन्या प्रशालेचे चित्रकला स्पर्धेत सुयश

0

सोलापूर,दि.१४: श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित सिध्देश्वर कन्या प्रशाला, सोलापूर, लायन्स क्लब्स आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब ऑफ सोलापूर ट्वीन सीटी, सोलापूर यांच्यावतीने पीस पोस्टर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

त्यामध्ये- त्रिवेणी महादेव ब-हाणपुरे, प्रिती अनिल व्हटकर, मेघना मोहन माने, श्रद्धा ईरण्णा बिळीअंगडी, दर्शना केदारनाथ आमाणे ( सर्व ७ वी अ ) ( विशेष प्राविण्य ) श्रावणी दिनेश डांगे ८ अ व अमृता बसवराज कलबुर्गे ८ अ यांना ( सुवर्णपदक व प्रमाणपत्र ) नेहा सोमशेखर भोगडे ( उत्कृष्ट चित्र अवॉर्ड ) या सर्वांना बक्षीस प्राप्त झाले आहे.

मार्गदर्शक कलाशिक्षक शशिकांत मोटगी यांना उत्कृष्ट कलाशिक्षक पुरस्कार व प्रशालचे मुख्याध्यापक मन्मथ उकरंडे यांना उत्कृष्ट मुख्याध्यापक, व कन्या प्रशालेस उपक्रमशिल शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्षा लायन्स नंदिनी जाधव, सचिव लायन सागर पुकाळे, झोन चेअरमन डॉ. राहुल चंडक यांनी क्लबच्या कार्याबददल गौरवोउदगार काढले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास झोन माजी सचिव सोमशेखर भोगडे, पर्यवेक्षिका सुनिता वाले सांस्कृतिक विभाग प्रमुख काशीनाथ आकाशे इ. उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here