सोलापूर, दि.8: Women’s Day: झुआरी अग्रो केमिकल्स (जय किसान) कंपनीतर्फे बोरमणी (Solapur) येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. ज्या महिला शेती क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात अशा यशस्विनी आग्रो प्रोडुसर कंपनीच्या 100 महिलांना भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
बोरामणी येथील यशस्विनी ॲग्रो प्रोडूसर कंपनी (Yashaswini agro producer company Boramani) अनिता माळगे हे नाव आता महाराष्ट्रात सर्वांना माहीत झाले आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून शेतकरी-उद्योजक महिलांशी संपर्क साधून थेट संवाद साधायचे ठरवले. तेव्हा महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्याच्या द. सोलापूर तालुक्यातल्या बोरामणी या गावातील अनिता माळगे यांची निवड झाली होती.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, या गावातल्या, खर्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ झालेल्या महिलांचा सन्मान जय किसान तर्फे करण्यात आला आणि त्यांना कंपनीचे नवरत्न पावर हे खत भेट म्हणून देण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ कंपनीचे विपणन अधिकारी विक्रम लाड, तसेच कृषी सल्लागार संकेत भोज, खत विक्रेते स्वामी समर्थ कृषी केंद्र बोरामनी आणि गावातील शेतकरी महिला उपस्थित होते.
