सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण 2012 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.4: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. सोलापूर शहर व जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. सोलापूर शहरातील चाचण्यांच्या प्रमाणात नवीन रुग्णांच्या संख्येत कधी वाढ तर कधी घट दिसून येत आहे तर जिल्हा ग्रामीण चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने नुकसान कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 1819 अहवाल प्राप्त झाले, यात 1627 निगेटिव्ह तर 192 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 97 पुरुष व 95 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात 1 जणांची नोंद मृत म्हणून आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1409 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 477 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 184669 झाली आहे. तर यापैकी 179556 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3704 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2408 पुरुष व 1296 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर शहर 1609 अहवाल प्राप्त झाले. यात 1506 निगेटिव्ह तर 103 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 55 पुरुष व 48 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 501 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 1535 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 33234 झाली आहे. तर यापैकी 31237 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1496 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 954 पुरुष व 542 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here