Home सामाजिक शौर्य आणि बुद्धीचे प्रतीक: शिवप्रताप दिन सोलापुरात उत्साहात साजरा

शौर्य आणि बुद्धीचे प्रतीक: शिवप्रताप दिन सोलापुरात उत्साहात साजरा

0

सोलापूर,दि.१०: शिवप्रताप दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम शौर्याचा, धडाडीचा आणि मुत्सद्देगिरीचा सुवर्णकाळ होय. याच ऐतिहासिक व प्रेरणादायी पर्वाचे औचित्य साधत, संभाजी ब्रिगेडच्या वतीने १० नोव्हेंबर रोजी होटगी रोडवरील शिवप्रताप चौकात ‘शिवप्रताप दिन’ अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मानाचा मुजरा करून करण्यात आली. प्रतापगडच्या पायथ्याशी महाराजांनी आदिलशाही सरदार अफजलखान आणि त्याचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यांचा वध केला होता. स्वराज्याच्या रक्षणासाठी जात-धर्म न पाहता महाराजांनी जे अभूतपूर्व रणकौशल्य आणि गनिमी कावा दाखवला, त्या ऐतिहासिक क्षणाला व स्मृतींना यावेळी उपस्थितांनी उजाळा दिला. शिवरायांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा हा प्रेरणादायी वारसा सदैव जिवंत ठेवण्याचा दृढ संकल्प यावेळी सर्वांनी केला.

या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके, शहर अध्यक्ष वैभव गायकवाड, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीनल दास, जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा कोळी यांच्यासह तेजस शेळके, विश्वजित गंभीरे, लक्ष्मण गंभीरे, पिंटू कोळी, श्रवण साळुंखे, महेश गुब्याड, गजानन शिंदे, आरुष शेळके, सिद्धराम घोडके, नागेश ख्याड, नागेश शिंदे, सनी पटू, पीटर पाटोळे, अमोल शिर्के, अभिजित भोसले, बसवेश्वर पाटील, कपिल नरूटे, रमेश भंडारे, स्वप्नील गायकवाड, निरंजन प्रसाद, सौरव जन्मा, राम राठोड आदी मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.