Home महाराष्ट्र पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत असे शोधा नाव

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत असे शोधा नाव

0

सोलापूर,दि.८: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदारांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट आहे की नाही, याची ऑनलाइन पद्धतीने खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदारांना घरबसल्या नाव शोधता यावे, यासाठी http://⁠mahaelection.gov.in⁠ या अधिकृत संकेतस्थळावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नाव शोधण्याची सोपी प्रक्रिया:

१. संकेतस्थळ: Google वर http://⁠mahaelection.gov.in⁠ हे संकेतस्थळ उघडा.

२. पर्याय निवडा: ‘Electoral Registration’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित ‘Graduate’ (पदवीधर) किंवा ‘Teachers’ (शिक्षक) मतदारसंघ निवडा.

३. माहिती प्रविष्ट करा: नाव शोधण्यासाठी पोच पावती क्रमांक (Acknowledgement Number), सध्याची यादी (Current Roll), अंतिम यादी (Final Roll) किंवा ‘जिल्हा–तालुका–नाव’ हे पर्याय वापरा.

पोच पावती क्रमांक नसल्यास मतदार आपला जिल्हा, तालुका आणि स्वतःचे नाव टाकूनही शोध घेऊ शकतात. आवश्यक ‘कॅप्चा’ (Captcha) कोड भरून सर्च केल्यास मतदाराची नोंद, मतदान केंद्र व इतर तपशील स्क्रीनवर दिसेल.

पूरक मतदार यादीबाबत महत्त्वाची सूचना:

पुणे पदवीधर मतदारसंघाची अंतिम मतदार यादी १२ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानंतरची पूरक मतदार यादी १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार असल्याने, मतदारांनी त्यानंतर पुन्हा एकदा आपले नाव आणि मतदान केंद्राची माहिती तपासून घेणे आवश्यक आहे. पूरक यादीमुळे पत्ता किंवा भाग क्रमांक बदललेला असण्याची शक्यता असल्याने अंतिमतः प्रसिद्ध झालेल्या यादीतील तपशीलाची खात्री करून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.