Home बॉलिवूड तुकाराम मुंढेंचा धडाका: शाहरुख खान, अजय आणि टायगरला FDA ची नोटीस

तुकाराम मुंढेंचा धडाका: शाहरुख खान, अजय आणि टायगरला FDA ची नोटीस

0

मुंबई,दि.१६: महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आपला धडाकेबाज धडक कारवायांचा धडाका सुरूच ठेवला असून, आता बॉलिवूडच्या दिग्गजांवर मोहीम उघडली आहे. राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याचे अप्रत्यक्ष प्रमोशन (Surrogate Advertising) केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तिघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.  

नोटिशीमधील प्रमुख मुद्दे आणि निर्देश:

१५ दिवसांची मुदत: ‘विमल पान मसाला / इलायची’च्या जाहिरातींमधील सहभाग तात्काळ थांबवावा, तसेच स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया आणि वेबसाइटवरून यासंबंधीचा सर्व मजकूर हटवावा. याप्रकरणी कायदेशीर कारवाई का करू नये, याचे लेखी उत्तर १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.  

अप्रत्यक्ष जाहिरातीचा ठपका: ही जाहिरात ‘विमल’ ब्रँडचे प्रमोशन करते. हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडलेला असल्याने, इलायचीच्या नावाखाली तंबाखूजन्य प्रतिबंधित उत्पादनाचेच अप्रत्यक्ष प्रमोशन केले जात असल्याचा ठपका एफडीएने ठेवला आहे.  

कायद्याचा बडगा: FSS कायदा, २००६ च्या कलम ३०(२)(अ) अन्वये अन्न सुरक्षा आयुक्तांनी राज्यात पान मसाला आणि गुटख्याच्या निर्मिती, साठवणूक, वितरण व विक्रीवर एका वर्षासाठी बंदी घातलेली आहे.

येथे पाठवली नोटीस: एफडीएने शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर, अजय देवगणच्या जुहू येथील निवासस्थानी आणि टायगर श्रॉफच्या प्रॉडक्शन हाऊसच्या (टायगर श्रॉफ प्रॉडक्शन्स एलएलपी) पत्त्यावर ही नोटीस धाडली आहे.  

एफडीएची राज्यभरात व्यापक मोहीम

आयुक्यपदी सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षेबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. दुधातील भेसळ, हॉटेल्समधील निकृष्ट खाद्यपदार्थ, शाळा परिसरातील जंक फूड विक्री, आणि बेकायदेशीर गुटख्याचे नेटवर्क यांविरोधात राज्यभर धाडसत्र सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आता थेट स्टार कलाकारांनाही नोटिसा पाठवून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.