रायपूर,दि.१४: आयपीएल २०२६ च्या हंगामात (IPL 2026) काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात एक थरारक सामना रंगला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ विकेट्सने विजय मिळवला. आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडणाऱ्या आरसीबीच्या विराट कोहलीला (Virat Kohli) ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
विराट कोहलीचा नवा विक्रम (Virat Kohli Record)
कोलकाताविरुद्धच्या या सामन्यात विराटने १५० धावांची (150 Runs) स्फोटक खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले. या शतकी खेळीसह विराट कोहली आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, रायपूरच्या स्टेडियमवर (Raipur Stadium) धावांचा यशस्वी पाठलाग करताना आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
मनीष पांडेचा ‘सुपरमॅन’ झेल (Manish Pandey Catch)
आरसीबीने हा सामना जिंकला असला, तरी केकेआरचा क्षेत्ररक्षक मनीष पांडे याने पकडलेल्या झेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल (Best Catch in IPL History) असल्याचे बोलले जात आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने टीम डेव्हिडला ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला, ज्यावर डेव्हिडने कट शॉट मारला. परंतु, पॉईंटला उभ्या असलेल्या मनीष पांडेने हवेत झेप घेत एक भन्नाट झेल टिपला.
मैदानावर दिसली खिलाडूवृत्ती (Sportsmanship)
मनीष पांडेचा हा झेल पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला होता, तर गोलंदाज कार्तिक त्यागीलाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. स्वतः फलंदाज टीम डेव्हिडही अवाक झाला. यावेळी विराट कोहलीने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत, प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू असूनही मनीष पांडे जवळ जाऊन त्याच्या या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे (Fielding) कौतुक केले.








