जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक निकालास सुरुवात 

0

सोलापूर,दि.9: महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचे निकाल आज जाहीर होत आहेत. निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या आघाडीवर आहेत. आज (दि.9) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 

सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर झेडपीसह पंचायत समित्यांचा यामध्ये समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या निकालात सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपचे उमेदवार सर्वाधिक ठिकाणी आघाडीवर आहे. भाजपनंतर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार अनेक जागांवर आघाडीवर आहेत. 

दक्षिण सोलापूर मधील बोरामणी  जिल्हा परिषद गटात भाजपाचे नेताजी खंडागळे आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मधील राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे आष्टी पंचायत समिती गणाचे अमित व्यवहारे विजयी

कोल्हापुरातील पहिला निकाल हाती. घुणकी, येथे काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या जिल्हा परिषद साठी विजयी. पंचायत समिती नवे पारगाव मध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी, तर घुणकी पंचायत समिती काँग्रेसचया संगीता संग्राम पाटील विजयी

माण तालुक्यातील कुकडवाड गटात मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे पिछाडीवर…राष्ट्रवादीचे अनिल देसाई 300 मतांनी आघाडीवर

लातूर, आर्वी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या राजश्री देशमुख विजयी. आर्वी पंचायत समिती गणात काँग्रेसच्या तनुजा चव्हाण तर, महापूर गणातून काँग्रेसचे श्रीकांत बैले विजयी 

लातूरमधून रेणापूर पंचायत समिती पानगाव गणात श्रीदेवी प्रकाश गालफाडे यांचा विजय. रेणापूर तालुक्यातील पानगाव गटातून मनसेचा उमेदवार विजयी. सुनील नागरगोजे विजयी. 

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी विजयी झाल्या आहेत.

बारामती पंचायत समिती

एकूण जागा : 12

राष्ट्रवादी अजित पवार : आघाडी 10 जागा

भाजप : 01 (विजयी सुपे पंचायत समिती)

भाजप : 01 आघाडीवर (शिरसुफळ पारवडी गण)

सोलापूर माळशिरस

दहिगाव गटात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांना धक्का
दहिगाव जिल्हा परिषद गटात आमदार जानकर यांचे पुत्र पराभूत
गुरसाळे पंचायत समिती गणात अर्जुनसिंह मोहिते पाटील पराभूत

धाराशिवच्या, ढोकी जिल्हा परिषद गट शिवसेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार तीर्थराज घाडगे  विजयी

राज्यातील जिल्हा परिषदेतील 731 जिल्हा परिषद सदस्यांपैकी 200 जागांचा कल हाती आला आहे. यामध्ये भाजप- 70, शिवसेना शिंदे गट- 38, राष्ट्रवादी अजित पवार गट- 43, काँग्रेस- 21, शिवसेना ठाकरे गट- 6, राष्ट्रवादी शरद पवार गट- 3, इतर- 11 जागांवर आघाडीवर आहेत. पहिल्या कलानूसार महायुतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेसने उघडले खाते. पलूस तालुक्यातल्या कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड विजय. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांचे भाचे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here