Astha Roti Bank | आस्था रोटी बँकेतर्फे गरजू लोकांना पारंपरिक फराळाचे वाटप 

0

सोलापूर,दि.११: Astha Roti Bank | “भुकेल्यांना अन्न… हाच खरा माणुसकीचा धर्म!” या तत्त्वाला अनुसरून, आस्था रोटी बँक आणि आस्था फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एक आगळावेगळा समाजोपयोगी उपक्रम राबवला गेला आहे. यामध्ये १५०० अंध, अपंग, निराधार महिला, वृद्ध आणि कुष्ठरोग वसाहतीतील रहिवाशांना पारंपरिक फराळाचे वाटप करण्यात आले आहे.

गेल्या ९-१० वर्षांपासून, आस्था रोटी बँक सोलापूर शहरात दररोज गरजूंना अन्नदान करून माणुसकीचा खरा धर्म जोपासत आहे. अन्न हे एक मूलभूत गरज असूनही, अनेकांना ते पुरेसे मिळत नाही ही जाणीव संस्थेच्या कार्याला दिशा देते.

काय म्हणाले विजय छंचुरे? | Astha Roti Bank

संस्थेचे समन्वयक विजय छंचुरे यांनी सांगितले, “आपण सर्वांनी मिळून समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी केले पाहिजे. ही सेवा म्हणजे एक साखळी आहे – माणुसकीची साखळी, ज्यात प्रत्येकाने स्वतःला जोडले पाहिजे. आषाढ शुद्ध एकादशी, म्हणजेच शयन एकादशी, ही दिवस भगवान विष्णू शयनास जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूर वारीचे विठोबा दर्शन, भक्तिभावाने भरलेली वारी, कीर्तन, भजन यांचा उत्सव साजरा केला जातो. तसेच, या दिवशी अनेक संस्था अन्नदान, आरोग्य तपासणी, वस्त्रदान, रक्तदान इत्यादी सेवाभावी उपक्रम राबवतात. आस्था रोटी बँकही त्या परंपरेला साजेसा हातभार लावत आहे.

सोलापुरतील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आस्थाच्या वतीने आषाढीचा प्रसाद म्हणुन भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्यावतीने विठ्ठलाची आरती व समुपदेशनाने प्रसाद वाटप करण्यात आला. त्यात शाबुदाणे खिचडी, वेफर्स, पेंडखजुर, राजगिरा लाडु ,ताक, भगर,आमटी, श्रीखंड अश्या फराळ पदार्थांचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.  

भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, राजू हौशेट्टी, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी, दिनानाथ धुळम, उडान पंख माणुसकीचे नरेंद्र करवा, अंकित झंवर, सुमित मर्दा, राजन लाड, विजय करवा, निलेश चौगुले, स्वप्निल माळी, राघवेंद्र स्वामी, संजीवन पंडित, हरीश उपाध्ये या सर्वांचे प्रमुख उपस्थिती 

आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, कांचन हिरेमठ, निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पुकाळे, विनोद भोसले, संगिता छंचुरे, ज्योत्सना सोलापूरकर, स्नेहा वनकुद्रे, सुरेखा पाटील, निता आक्रुडे, अविनाश मार्चला, अर्चना कांबळे, स्वप्ना कांबळे, लक्ष्मी कुलकर्णी, श्रीदेवी बिराजदार आदींनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here