69 लाख 45 हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

0

सोलापूर,दि.20: सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा कंपनीचे 12 टायर वाहन क्र-आर.जे-11- जीसी-9118 या वाहनाची तपासणी केली असता  त्यामध्ये 24 हजार 498 किलो वजनाची  रंगमिश्रीत व निकृष्ट दर्जाची  सुपारी आढळून आली. सदर मालाची किंमत सुमारे  69 लाख 45 हजार 183  रुपये  इतकी असून, हा साठा जप्त करण्ययात आला असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांनी दिली.

सहायक आयुक्त (अन्न) सा.ए.देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी किटकबाधीत व रंग मिश्रीत सुपारी  अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन, उर्वरित 24 हजार 498 किलो, किंमत 69 लाख 45 हजार 183 रुपयेचा साठा कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करून ताब्यात घेतला आहे. सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे.

सदरची कारवाई सहायक आयुक्त साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी व श्रीमती अस्मिता टोणपे तसेच नमुना सहायक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने केली असल्याचे  अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (अन्न) श्री.देसाई यांनी कळविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here