मुंबई,दि.21: Gautam Adani On Congress: उद्योगपती गौतम अदानी यांनी काँग्रेसची स्तुती केली आहे. अदानी यांचे नाव अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडले गेले आहे. भाजपा सरकार अदानी-अंबानी यांच्यासाठी काम करत असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. अशातच अदानी यांनी काँग्रेसची स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसची स्तुती | Gautam Adani Congress
अदानी ग्रृपचे चेयरमन गौतम अदानी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची स्तुती केली आहे. अचानक गौतम अदानी यांनी केलेल्या काँग्रेसच्या स्तुतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
”1991 ते 2014 चा काळ हा देशाच्या विकासाचा भक्कम पाया तयार करणे व योग्य रनवे निर्माण करण्याचा होता तर 2014 ते 2024 हा काळ देशाच्या विकासाच्या टेकऑफचा होता. माजी पंतप्रधान पीवी नरसिंहा राव व त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी आणलेली आर्थिक सुधारणा ही देशाच्या इतिहासात महत्त्वाची ठरली. 1991 मध्ये काँग्रेसच्या सरकारने जागतिकीकरणाच्या उद्देशाने आर्थिक सुधारणांची मालिका सुरू केली. 1991 हे देशाच्या आर्थिक सुधारणेसाठी महत्त्वाचे वर्ष ठरले”, असे गौतम अदानी म्हणाले.