नवी दिल्ली,दि.21: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मद्य घोटाळा प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाकडून देण्यात आलेल्या जामीनाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत जामिनावर स्थगिती दिली आहे. (Stay On Arvind Kejriwal’s Bail)
केजरीवाल यांच्या जामिनावर सुटण्याच्या आदेशाला ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ईडीने आपल्या एसएलपीमध्ये म्हटले आहे की, तपासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर केजरीवाल यांना सोडल्यास तपासावर परिणाम होईल कारण केजरीवाल हे मुख्यमंत्र्यासारखे महत्त्वाचे पद भूषवत आहेत.
यावर केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद उच्च न्यायालयाने फेटाळला असून, या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, न्यायमूर्ती सुधीर जैन म्हणाले की, जोपर्यंत उच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे, तोपर्यंत कनिष्ठ न्यायालयाचा आदेश प्रभावी ठरणार नाही.
खरं तर, केजरीवाल यांना गुरुवारीच कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला होता, त्याविरोधात ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन आणि रविंदर दुडेजा यांच्या सुटी खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. ईडीतर्फे हजर झालेल्या वकिलांनी सांगितले की, आम्हाला कनिष्ठ न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही.
एएसजी राजू म्हणाले की, आम्हाला आमचे लेखी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आलेला नाही. हे अजिबात न्याय्य नाही. ईडीने पीएमएलएच्या कलम 45 चा हवाला दिला आहे. एएसजी राजू म्हणाले की आमची केस खूप मजबूत आहे. सिंघवी यांच्या उपस्थितीचा विरोध केला.