मुंबई,दि.22: IPL 2024 Schdule: इंडियन प्रीमियर लीग 2024 चे वेळापत्रक आले आहे. याची घोषणा आज (22 फेब्रुवारी) करण्यात आली. आयपीएलच्या वेळापत्रकाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. IPL मधील पहिला सामना 22 मार्च रोजी महेंद्रसिंग धोनीच्या (MS धोनी) चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि फाफ डू प्लेसिसच्या (Faf du Plesis) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक (22 मार्च ते 7 एप्रिल) जाहीर करण्यात आले आहे. हे 21 सामने दोन आठवड्यांच्या कालावधीत होणार असून 10 शहरांमध्ये 21 सामने खेळवले जातील. आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान 22 मार्चला खेळवला जाणार आहे. आयपीएल 2024 मधील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. उद्घाटनाचा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. उर्वरित सामने दुपारी 3.30 किंवा 7.30 वाजता सुरू होतील.
IPL 2023 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक
1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00 pm
2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वा.
3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, 7.30 वाजता 4.
राजस्थान रॉयल्स वि लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 pm
5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, 7.30 pm
6. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, बेंगळुरू, 7.30 pm 7.
चेन्नई सुपर किंग्स वि गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, 7.30 pm
8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, 7.30 pm
9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, 7.30 pm
10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स , 29 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनौ, 7.30 वाजता
12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, 3.30 वाजता 13.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च , विझाग, 7.30 PM
14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, 7.30 PM
15. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 3 एप्रिल विझाग, संध्याकाळी 7.30
17. गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30
18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30
21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनऊ, संध्याकाळी 7.30 वाजता
आयपीएलचा पहिला सामना शुक्रवारी होणार आहे, शनिवार आणि रविवारी डबल हेडर सामने खेळवले जाणार आहे. 21 सामन्यात चार वेळा डबल हेडरचे सामने होणार आहेत. यानुसार पहिला सामना दुपारी 3.30 तर दुसरा सामना संध्याकाळी 7.30 खेळवला जाईल.