नवी दिल्ली,दि.28: Rahul Gandhi On Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भावनिक ट्विट केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraba Modi) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिराबेन मोदी यांची प्रकृती ठिक होण्यासाठी देशवासीयांकडून प्रार्थना केली जात आहे. राहुल गांधी यांनी देखील त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना केलीय. याबरोबरच अशा कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांचे भावनिक ट्विट | Rahul Gandhi’s emotional tweet
“आई आणि मुलगा यांच्यातील प्रेम हे शाश्वत आणि अमूल्य आहे. मोदीजी या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की तुमच्या आई लवकरात लवकर बऱ्या होतील.” असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
प्रियांका गांधींचे ट्विट | Priyanka Gandhi’s tweet
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यानी देखील ट्विट केले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईंची तब्येत खालावल्याची बातमी मिळाली. अशा परिस्थितीत आपण सर्व त्यांच्यासोबत आहोत. मोदीजी यांच्या आईंची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते, असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे.
दरम्यान, काही वेळापूर्वी रुग्णालयाने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये हिराबेन मोदी यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. अहमदाबादमधील यूएन मेहता रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत रूग्णालयात आहे. पंतप्रधान मोदी देखील रूग्णालयात पोहोचले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.