वेटलिफ्टिंग व कुस्ती स्पर्धेत ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निकचे उत्तुंग यश

0

सोलापूर,दि.8: वेटलिफ्टिंग व कुस्ती स्पर्धेत ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निकचे उत्तुंग यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन डिप्लोमा स्टुडंट स्पोर्टस असोशियशन अंतर्गत झोन-सीस्पर्धा (IEDSSA) सहकारमहर्षी पॉलिटेक्निक, अकलूज येथे दि. 05 नोव्हेंबर ते 06 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडली.

वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम पारितोषिक

त्यामध्ये दि. 05 नोव्हेंबर रोजी झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत ब्रम्हदेवदादा माने पॉलिटेक्निकचा विद्यार्थी लक्ष्मण म्हमाणे याने प्रथम पारितोषिक पटकावले. त्याची पुढे राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली.

कुस्ती 97 किलो वजनी गटात दुसरा क्रमांक

तसेच दि. 06 नोव्हेंबर 2002 रोजी झालेल्या कुस्ती 97 किलो वजनी गटात सुरजसिंग मरोड याने दुसरा क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेसाठी त्यांना प्राचार्य एस. व्ही कुलकर्णी, प्रा. आर. आर. तुपे आणि स्पोर्टस प्रतिनिधी प्रा. एस. एस. सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

संस्थेच्या वतीने प्राचार्य एस. व्ही. कुलकर्णी तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडाचे महत्व जाणून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने, संचालिका जयश्री माने, कॅम्पस डायरेक्टर राहुल माने यांनी मार्गदर्शक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here